छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
पुत्र व्हावा ऐसा गुंडा |
ज्याचा तीही लोकी झेंडा ||
तुकोबारायांनी या ओळी जणू याच व्यक्तीसाठी लिहिल्या आहेत.
लेखणी आणि तलवार यांचा सर्वश्रेष्ठ मिलाप याचं एकमेव ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज
ज्यांची आयुष्याची सुरुवात च संघर्षाने झाली,
वयाच्या नवव्या वर्षी बालक्रीडा सोडून शत्रूच्या गोटात ओलीस राहून दिल्ली दरबारात सात हजारी मनसबदारी असणारा #युवराज...
वयाच्या तेराव्या वर्षी स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री म्हणून आपले कर्तव्य बजावून सर्व युरोपियन अधिकाऱ्यांना दुभाषी शिवाय उत्तर देणारे #प्रकांडपंडित,
वयाच्या तेव्वीसाव्या वर्षी राजा होणारा आणि आपल्या पिताच्या स्वप्नांसाठी स्वदेहाची आहुती देणारा #त्यागी,
एकाच वेळी मुघल, कुतुबशहा, अदिलशहा, म्हैसूरचा राजा चिक्कदेव,जंजिऱ्याचा सिद्दी खैरीयत, पोर्तुगीज, इंग्रज अश्या बलाढ्य शक्तींना आस्मान दाखवणारा #रणधुरंधर
ज्यांचा मृत्यूच स्वराज्याच्या प्रत्येक घटकांसाठी एक प्रेरणा स्रोत ठरला आणि आपल्या हत्याऱ्याची याच मराठी मातीत कबर खांदनारा #क्षात्रवीर
राजनीतिशास्त्र वरील बुधभुषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक असे साहित्य निर्माण करणारे
#संस्कृतपंडित, #ब्रजभाषा पंडित, #साहित्यिक,#महाकवी..
आश्या अनेक उपाधी कमी पडाव्यात असे अलौकिक, सूर्यतेजस्वी महापुरुष अजूनही उपेक्षित राहिले हेच आपल्या भूमीच दुर्दैव.
परंतु महाराष्ट्र भूमीत शेकडो वर्षांनी का होईना पण एक दिवस येईल आणि हा युगपुरुष आत्मसन्मान, ध्येयनिष्ठता,स्वराज्य आणि स्वहक्काचा द्योतक आणि प्रेरणादायी मशाल ठरेल आणि संबंध जग ज्यांच्या कार्यकर्तीला आदराने वंदन करेल अश्या स्वराज्याचे धाकले धनी, क्षात्रवीर,अनेक कलेचे अधिपती छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन व अभिवादन...
जय शिवराय जय शंभूराजे
~ अक्षयवर्ण
Comments
Post a Comment