Posts

Showing posts from March, 2025

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

 पुत्र व्हावा ऐसा गुंडा | ज्याचा तीही लोकी झेंडा || तुकोबारायांनी या ओळी जणू याच व्यक्तीसाठी लिहिल्या आहेत. लेखणी आणि तलवार यांचा सर्वश्रेष्ठ मिलाप याचं एकमेव ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांची आयुष्याची सुरुवात च संघर्षाने झाली,  वयाच्या नवव्या वर्षी बालक्रीडा सोडून शत्रूच्या गोटात ओलीस राहून दिल्ली दरबारात सात हजारी मनसबदारी असणारा #युवराज...  वयाच्या तेराव्या वर्षी स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री म्हणून आपले कर्तव्य बजावून सर्व युरोपियन अधिकाऱ्यांना दुभाषी शिवाय  उत्तर देणारे #प्रकांडपंडित,  वयाच्या तेव्वीसाव्या वर्षी राजा होणारा आणि आपल्या पिताच्या स्वप्नांसाठी स्वदेहाची आहुती देणारा #त्यागी,  एकाच वेळी मुघल,  कुतुबशहा, अदिलशहा, म्हैसूरचा राजा चिक्कदेव,जंजिऱ्याचा सिद्दी खैरीयत, पोर्तुगीज, इंग्रज अश्या बलाढ्य शक्तींना आस्मान दाखवणारा #रणधुरंधर  ज्यांचा मृत्यूच स्वराज्याच्या प्रत्येक घटकांसाठी एक प्रेरणा स्रोत ठरला आणि आपल्या हत्याऱ्याची याच मराठी मातीत कबर खांदनारा #क्षात्रवीर   राजनीतिशास्त्र वरील बुधभुषण, नायिकाभेद, नखशि...

जगद्गुरु तुकाराम

  ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥ नोहे ऐसें काहीं नाहीं अवघड। नाहीं कईवाड तोंच वरि॥ दोरें चिरा कापे पाडिला कांचणी। अभ्यासें सेवनी विष पडे॥ तुका म्हणे कैचा बैंसण्याची ठाव। जठरीं बाळा वाव एकाएकीं॥ अ. क्र. 902 गाथा एखाद्या व्यक्तीला तत्कालीन सतराव्या शतकातील आधुनिक ज्ञानाबद्दल अनभिज्ञता असूनदेखील जगद्गुरु म्हणलं जातं;  याचं कारण शोधलं तर संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आपल्या या कुत्सित बुद्धीला भेद देऊन त्यांचं माहात्म्य विषद करतं. त्यातीलच एक हा अभंग अगदी चार ओळीचा; पण, त्यातील अर्थ शोधला आणि तो फक्त शोधून उपयोग नाही तो अंगिकारला तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल. गावातील एखाद्या वाड्यावर भक्कम दगडावर आपल्याला छोटेसे रोपटे उगताना दिसते आणि हळू हळू ते एवढे मोठे होते की संपूर्ण दगडांची भिंत भेदून, हवा, पाणी, पोषकद्र्वांची कमतरता अशा अनेक अडचणींचा सामना करत उभं राहतं आणि फुलतं. अगदी अश्याच प्रकारे आपल्याला एखादे ध्येय आजच्या भाषेत GOAL साध्य करायचे असेल तर असाच रोज थोडा थोडा अभ्यास करून अनेक अडचणरूपी पाषाणांना भेदून, अनेक परिश्रमातून ते साध्य होऊ शकत हेच सांगण्या...